Yes Bank Fraud Case: EDचा मोठा दणका, राणा कपूर यांची लंडनमधील तब्बल 127 कोटींची संपत्ती जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/tn-1.jpg)
नवी दिल्ली: सक्तवसूली संचालनालयाने यस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांची लंडनमधली संपत्ती जप्त केलेली आहे. 77 साउथ ऑडली स्ट्रीट इथं त्यांच अपार्टमेंट होतं. या अपार्टमेंटची किंमत 13.5 मिलियन पाउंड म्हणजेच तब्बल 127 कोटी रुपये एवढी आहे. कपूर यांनी 2017मध्ये 9.9 मिलियन पाउंडला (93 कोटी ) हे घर घेतलेलं होतं. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले राणा हे घर विकण्याच्या प्रयत्नांमध्ये होते अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिलेली आहे.
कपूर यांनी लाच घेऊन अनेक कंपन्यांना कोट्यवधींची कर्ज दिली आणि नंतर ती कर्ज ही एनपीए म्हणून दाखविण्यात आली होती. त्यामुळे बँकेचं काही हजार कोटींचं नुकसान झालं होतं. दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना 8 मार्चला रविवारी पहाटे अटक केली होती. ईडीच्या अधिकार्यांनी सुमारे 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केलेली होती.