breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

YES BANK च्या खातेदारांना मोठा दिलासा,लवकरच हटू शकतात निर्बंध

नवी दिल्ली | महाईन्यूज |

YES BANKच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक YES BANK च्या खातेदारांना 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात येण्याची शक्याता आहे. RBI आठवड्याभरात बँकेतून 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवू शकते. सद्यस्थितीत ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत आहेत. त्याहून अधिकची रक्कम ग्राहक काढू शकत नाही. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.  


केंद्रीय तपास यंत्रणा(CBI) ने Yes Bank प्रकरणात राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईतल्या DHFLच्या अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबई आणि दिल्लीतल्या अनेक ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले आहेत. सीबीआयनं आतापर्यंत जवळपास 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. छापा टाकलेल्या ठिकाणांमधली जास्त करून कार्यालयं ही मुंबईस्थित आहेत.


YES BANKचं नियंत्रण स्टेट बँकेच्या हातात आल्यानंतर तरलता आणि व्यवहार्यतेची चिंता संपुष्टात येणार आहे. अशातच पैसे काढण्याच्या मर्यादेचे निर्बंधही हटवले जाण्याची शक्यता आहे. RBI 16 मार्चला येस बँकेवरचे निर्बंध हटवण्याचा विचार करत होती, पण समभागदार न्यायालयात जाणार असल्याचं समजल्यानंतर आरबीआयनं रणनीतीत बदल करू शकते, त्यामुळे आरबीआय कडून आठवड्याभरात हे निर्बंध शिथिल करण्यासंबंधी निर्णय होवू शकतो. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button