नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का असतो? वाचा सविस्तर..
![Why Navratri festival is nine days read in detail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Navratri-2023-3-780x470.jpg)
Navratri 2023 : देशात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? नवरात्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘नऊ रात्री’ असा होतो. नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो.
नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का?
नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा केली जाते. कारण त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक यांचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर नऊ दिवसांत ते अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. तसेच जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे. म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते.
हेही वाचा – ‘किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ
आजचा रंग : जांभळा
जांभळ्या रंगाचे महत्त्व : आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो. जांभळा रंग हा लाल आणि निळा या रंगाच्या मिश्रणाने तयार झाला आहे. या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते. या रंगाचा शरीर, मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडतो. जांभळा रंग आवडणारे लोक शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, दूरदर्शी असतात असे मानले जाते.