breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Makar Sankranti | मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्व..

Makar Sankranti 2024 | आज नवीन वर्षाचा पहिलाच सण मकर सक्रांत हा आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. पण मकर संक्रांतीच्या सणाचं महत्त्व नेमकं काय आहे हे माहित आहे का?

‘मकर’ हा शब्द मकर राशीशी संबंधित आहे, तर ‘संक्रांती’ याचा अर्थ संक्रमण असा आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळेच याला ‘मकर संक्रांत’ असं म्हणतात.

हेही वाचा    –    सामाजिक एकोप्याचा संदेश देत युवक राष्ट्रवादीचा ‘क्षितिज-२०२४’ उत्साहात

अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी, उत्तरायण, तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी महिला घरी हळदी-कुंकू करतात आणि एकमेकींना वाण देतात. तसेच, या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. नात्यातला गोडवा वाढावा यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगुळही दिले जातात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button