धनत्रयोदशी का साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाचे धार्मिक महत्त्व
Dhanteras 2023 : हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. या सणाला धनतेरस म्हणून ओळखतात. धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस तेरावा दिवस दर्शवितो.
असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली. आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
हेही वाचा – पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिवाळी भेट, ३५ हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी
भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी देखील लाभते. याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पुजा केली जाते. घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते.
धनत्रयोदशी मुहुर्त :
संध्याकाळी ५.५५ ते ८.०८ पर्यंत पुजेचा मुहूर्त आहे.