breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिवाळी भेट, ३५ हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी

पुणे : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणेकरांना खास दिवाळी भेट दिली आहे. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ३५ हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे जिह्यातील वाहतूक आणखी सुखकर होणार आहे.

पुणे शहरातील रस्ता, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्र शासन मल्लांच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करा’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

दुसरा प्रकल्प पुणे-छत्रपती संभाजीनगरमधील आहे. या दोन शहरांना जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. चाकण, तळेगावमार्गे हा रस्ता तयार होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत हा महामार्ग तयार केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button