breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी आणि अदानी कोणत्या स्थानावर? एकूण संपत्ती जाणून घ्या..

World Richest Person | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे (X) मालक एलॉन मस्क यांना जोरदार दणका बसला असून जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांची घसरण झाली आहे. फ्रेंच उद्योगपती आणि लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नोल्ट आता पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पण जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं स्थान काय आहे हे जाणून घेऊयात..

अंबानी आणि अदानी यांची एकूण संपत्ती किती? 

आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे नाव फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत ११ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १०४.४ अब्ज डॉलर्स आहे. तर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी या यादीत १६ व्या स्थानावर आहेत. त्याच्याकडे एकूण ७५.७ डॉलर्स बिलियन आहे.

हेही वाचा   –    ‘आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही’; देवेंद्र फडणवीसांनी मांडली भाजपची भूमिका 

फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नोल्ट आणि एलॉन मस्क यांच्यानंतर या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १८१.३० अब्ज डॉलर्स आहे. लॅरी एलिसनचे नाव चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १४२.२० अब्ज डॉलर्स आहे. १३९.१ अब्ज डॉलर्ससंपत्तीसह, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत पाचव्या स्थानावर आहे. यानंतर वॉरन बफेट, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांच्या नावाचाही जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button