Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

म्युच्युअल फंडात कोट्यावधी..राहुल गांधी यांची एकुण संपत्ती किती?

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या शपथपत्रात राहुल गांधी यांनी आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे. या माहितीनुसार राहुल गांधींची एकुण संपत्ती २० कोटी रूपये इतकी आहे.

राहुल गांधी यांनी ४.३ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. तर म्युच्युअल फंडात ३.८१ कोटींची गुंतवणूक आहे. राहुल गांधी यांच्या बँक खात्यात २६.२५ लाख आहेत. राहुल गांधी यांच्याकडे ५५ हजारांची रोकड आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न १.०२ कोटी असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे १५.२ लाखांचे गोल्ड बॉण्ड आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय बचत योजना (नॅशनल सेविंग्ज स्किम), पोस्ट खात्यात बचत, इन्शुरन्स पॉलिसि आणि इतर मिळून ६१.५२ लाख रुपये गुंतविले आहेत.

हेही वाचा    –    ‘श्रीकांत शिंदे अजून ‘बच्चा’, यंदा दिल्लीत जाणार नाहीत’; संजय राऊतांचा हल्लाबोल 

राहुल गांधी यांच्याकडे ४.२ लाख रुपयांचे दागिने आहेत. एकूण जंगम मालमत्ता ९.२४ कोटी आणि ११.१४ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. दोन्ही मिळून एकूण २० कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय त्यांच्यावर ४९.७ लाखांचे कर्जही आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये राहुल यांचं कार्यालय आहे. याची किंमत ९ कोटी रुपये इतकी आहे. तर राहुल गांधी यांच्याकडे एकही कार नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हणण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button