‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणजे काय? जाणून शुभ मुहूर्त, पूजेची वेळ
![What is Angaraki Sankashti Chaturthi?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Angarki-Sankashti-Chaturthi-780x470.jpg)
Angarki Sankashti Chaturthi 2024 | प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. मात्र जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ असे म्हणतात.
हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पुजा व श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. आज संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही साजरी होणार आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते.
हेही वाचा – ‘कंगना रणौतला राष्ट्रपती भवनात ठेवावं’; संजय राऊत यांचा टोला
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त :
कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २५ जून रोजी पहाटे १.३२ वाजता सुरू होईल आणि रात्री ११.१० वाजता समाप्त होईल. पहाटे ते दुपारी २ वाजून ३२ वाजेपर्यंत श्रवण नक्षत्र आहे. या दिवशी ब्रह्म मूहूर्त पहाटे ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटापर्यंत असणार आहे.
चंद्रोदय वेळ :
रात्री १०.०५ वाजता चंद्रोदय