breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#Waragainstcorona: कराड शहर आणि परिसरात १०० टक्के लॉकडाउन; हॉस्पिटलव्यतिरिक्त सर्व सुविधा बंद!
कराड । महाईन्यूज । प्रतिनिधी
कराड तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कडक पाऊले उचलत कराड शहर व परिसर १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. हॉस्पिटलांव्यतिरिक्त कोणतीही सुविधा सुरू नाही.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कराड शहराच्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली व डी.वाय.एस.पी.सुरज गुरव, पी.आय.बी.आर.पाटील, ए. पी.आय.विकास बडवे यांच्याशी संपूर्ण परिस्थितीबाबत व अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.