पती म्हणून जुळ्या भावाने वहिनीवर केला बलात्कार, ६ महिन्यानंतर झाला धक्कादायक खुलासा
![पती म्हणून जुळ्या भावाने वहिनीवर केला बलात्कार, ६ महिन्यानंतर झाला धक्कादायक खुलासा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/पती-म्हणून-जुळ्या-भावाने-वहिनीवर-केला-बलात्कार-६-महिन्यानंतर-झाला.jpg)
लातूर : जुळे भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन भावजईसोबत काळे कृत्य केल्याची धक्कादायक बाब लातूरमध्ये समोर आली आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे या घटनेनंतरही पतीसह, सासू-सासरे यांनीही या कृत्याला नैतिक ठरवत विवाहितेला दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. गतवर्षी एका २० वर्षीय तरुणीचा लातुरातील रिंगरोड परिसरातील एका तरुणाशी विवाह झाला. या तरुणाला एक जुळा भाऊ आहे. याचा गैरफायदा घेऊन दिराने भावजईसोबत अनैतिक संबंध ठेवले. ही बाब सहा महिन्यानंतर विवाहित महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर या महिलेने ही बाब तिचे पती, सासू आणि सासरे यांना सांगितली. मात्र, याची वाच्यता कुठेही न करता याकडे दुर्लक्ष करत जसं सुरू आहे तसं सुरू ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
हे ऐकून त्या विवाहित महिलेला धक्का बसला. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. मात्र, तिला परत सासरी आणण्यासाठी दीर गेला असता तिने सासरी येण्यास नकार दिला. आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर झालेला प्रकार महिलेने घरी सांगितला. यामुळे तिच्या आई-वडिलांनाही धक्का बसला. याप्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पती, दीर, सासू, सासरे यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही जुळ्या भावांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलकांते करीत असल्याची माहिती लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.