ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

‘यूपी’च्या भैय्याची चक्क ९९ हजार रुपयांत आयुष्यभर पाणीपुरी खाण्याची ऑफर

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून खवय्यांपर्यंत लोकांची गर्दी

नागपूर : लोकांना आकर्षित करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. त्यातच नागपूरकर पाणीपुरी खाण्यातही काही मागे नाही. हे ओळखून ‘यूपी’च्या भैय्याने चक्क ९९ हजार रुपयांत आयुष्यभर पाणीपुरी खाण्याची ऑफर ठेवली आहे. ही ऑफर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

वर्धा रोडवरील राहाटे कॉलनी चौकाच्या रस्त्यावर अमरज्योती पॅलेस जवळ रोज संध्याकाळी ६ वाजतानंतर एक हातगाडी लागते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खवय्ये या पाणीपुरीचे फॅन झाले आहेत. तेथे हातगाडी लागताच गर्दी होते.

त्याच्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी विविध ऑफर्सचे फलक दिसतात. लोकं या ऑफर बघून गोंधळतात. कुठली ऑफर परवडणारी आहे, असा विचार करतात. सहा महिन्यांपासून विविध ऑफरमुळे विजय मेवालाल गुप्ता हा पाणीपुरी विक्रेता चांगलाच चर्चेत आला आहे.

धंतोलीच्या तकिया भागात राहणाऱ्या विजयचा आजोबांच्या काळापासून हा व्यवसाय आहे. तो उत्तर प्रदेशच्या जौनपूर भागातील मूळ रहिवासी आहे. विजयची ही तिसरी पिढी आहे. पाणीपुरी खाण्याचे आरोग्याला फायदे त्याने फलकातून सांगितले आहे.

हेही वाचा –  कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली

कार्पोरेट कंपन्या डिस्काउंट देतात, तसे आपणही काही करू शकतो का? सोने कर्जाप्रमाणे आपणही पैसे जमा ठेवून लोकांना त्यापैशात पाणीपुरी देऊ शकतो, अशी कल्पना सुचली आणि त्याने चक्क ९९ हजारांची ऑफर ठेवली.

या ऑफरनी वेधून घेतले लक्ष

९९ हजारांत आयुष्यभर पाणीपुरी खा

लाडक्या बहिणींना ६० रुपयांत पोटभर पाणीपुरी

सर्वसामान्यांना १९५ रुपयांत पोटभर पाणीपुरी

वार्षिक ५ हजार द्या १० हजाराची पाणीपुरी खा

१५१ रुपयांची पाणीपुरी खा २१ हजारांचे पुरस्कार मिळवा

विक्रेत्याची सोशल मीडियावर खमंग चर्चा
विजयच्या ऑफर्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. त्याचा व्हीडिओ वायरल होत आहे. तेलीपुरा येथील रहिवासी आकाश शाहू यांनी चक्क ९९ हजारांची ऑफर स्वीकारली आहे. ही ऑफर स्टँप पेपरवर लिहून दिल्याचे विजयने सांगितले.

मोठमोठ्या कंपन्यांच्या डिस्काउंट योजना बघून आपल्याला ही ऑफरची कल्पना सुचली. ही ऑफर्स सोशल मीडियावर चांगलीच हीट झाली आहे. लोकांना टेस्ट आवडली. त्यामुळे लोकं गर्दी करीत आहेत. पत्नी प्रतिभा आणि कर्मचारी गोविंदच्या मदतीने याला बळ मिळाले आहे.

– विजय गुप्ता, पाणीपुरी विक्रेता

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button