अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू; चार जण जखमी
![Two killed in a shooting at a shopping mall in the United States; Four people were injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/1Shoot_1.jpg)
नवी दिल्ली |
अमेरिकेतील नॉर्थ मिलवॉकीच्या एका शॉपिंग मॉलमध्ये सोमवारी गोळीबार झाला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयीत हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. बोईस, इडाहोमध्ये ही घटना घडली. एका पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेनंतर पोलीस आणि संशयितांमध्ये गोळीबार झाला. त्यानंतर मॉल पूर्णपणे खाली करण्यात आला असून या घटनेत आणखी कोणी जखमी किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच तपास चालू असल्याचे सांगत पोलिसांनी पीडित किंवा संशयितांबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
बॉईसचे पोलीस प्रमुख रायन ली म्हणाले की, रात्री सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास गोळीबाराची माहिती मिळाली. त्यावेळी एका व्यक्तीला गोळीबार करून मारण्यात आलं होतं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना संशयितासारखीच एक व्यक्ती दिसली. त्यानंतर काही वेळातच पुन्हा गोळीबार झाला. या गोळीबारात एक अधिकारी जखमी झाला, तसेच संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान आतापर्यंतच्या तपासानुसार तिथे केवळ एकच हल्लेखोर होता आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळे लोकांना कोणताच धोका नाही, असं रायन यांनी सागितलं. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास आणि हल्लेखोराने नेमकं कोणत्या उद्देशाने गोळीबार केला, याचा तपास सुरू आहे.