Breaking-newsआंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
‘ट्विटर’च्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचा राजीनामा
![Twitter grievance redressal officer resigns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/twitter-symbol.jpg)
नवी दिल्ली |
माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांच्या मुद्दय़ावर ट्विटर आणि सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच ट्विटरचे भारतातील निवासी तक्रार निवारण अधिकारी धमेंद्र चतुर यांनी राजीनामा दिला आहे. चतुर यांच्या राजीनाम्यामुळे वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ट्विटरकडे अधिकारी उरलेला नाही.
ट्विटरने या घडामोडीबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नव्या समाजमाध्यम नियमांवरून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये शीतयु्द्ध सुरू असताना ही घडामोड घडली आहे. नव्या नियमांनुसार, तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे समाजमाध्यम कंपन्यांना अनिवार्य करण्यात आले आहे.