न्यायमूर्तींबद्दलचे ट्विट भोवले; अभिनेता चेतन कुमारला अटक
![Tweets about justices; Actor Chetan Kumar arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Actor.jpeg)
बंगळुरू | प्रतिनिधी
हिजाब प्रकरणावर सुनावणी करणार्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविषयी केलेले ट्विट दाक्षिणात्य अभिनेता चेतन कुमारला चांगलेच भोवले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शेषाद्रीपुरम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी चेतनला मंगळवारी अटक केली, अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली.
कर्नाटकच्या महाविद्यालयात हिजाबवरून निर्माण झालेला वाद कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचला. या प्रकरणावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावरून अभिनेता चेतन कुमारने ट्विट केले होते. १६ फेब्रुवारीला त्याने न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्याबद्दलचे जुने ट्विट रिट्विट केले होते. या जुन्या ट्विटमध्ये न्यायमूर्ती दीक्षित यांनी बलात्काराच्या आरोपीला अटक करण्यापूर्वी जामीन न देण्याबाबत लिहिले होते. हेच रिट्विट चेतनने केल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. हे ट्विट मी दोन वर्षांपूर्वी केले होते. यामध्ये मी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत लिहिले होते, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे त्यावरून त्याच्यावर कारवाई झाली आहे.