ट्रम्प यांचा थयथयाट; भारतावर ५० टक्के टॅरिफ…..
रशिया-चीनसोबतची जवळीक पाहूनाल्डन अमेरिकेची अस्वस्थता
वॉशिंग्टन :अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कठोर भूमिका घेतली असून भारतावर थेट ५० टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
भारतावर आर्थिक दबाव, पण भारताचा ठाम पवित्रा
अमेरिकेने लावलेला ५० टक्के टॅरिफ भारताच्या व्यापारावर थेट परिणाम करत आहे. विशेषतः अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनांवरील कर वाढल्यामुळे भारतीय व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. तरीही भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की, भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि परराष्ट्र धोरण स्वहितानुसार ठरवले जाईल.
रशिया-चीन-भारत एकत्र येत असल्याने ट्रम्प अस्वस्थ
ट्रम्प यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भारत, रशिया आणि चीन यांच्यातील वाढत्या सहकार्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “माझ्या काळात पुतिनसोबत चांगले संबंध होते, पण आता मी त्यांच्यावर नाराज आहे. युक्रेन युद्धावर आमच्या अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.“
तसेच त्यांनी हेही सांगितले की, “चीनला अमेरिकेची गरज आहे, आणि आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे.“
अमेरिकेत ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध
ट्रम्प यांच्या भारतविरोधी आर्थिक निर्णयामुळे अमेरिकेतील काही व्यापाऱ्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. आयात खर्च वाढल्यामुळे स्थानिक बाजारात भारतीय वस्तू महाग झाल्या आहेत आणि स्पर्धा कमी झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील उद्योगपती आणि व्यापारी वर्ग ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
भारताने दिला स्पष्ट इशारा
भारत सरकारकडून यावर प्रतिक्रिया देताना सांगण्यात आले की, “भारत हे एक सार्वभौम राष्ट्र असून आमच्या परराष्ट्र धोरणावर आम्हीच निर्णय घेऊ. कोणत्याही परदेशी दबावामुळे आमची भूमिका बदलणार नाही.“
भारताने रशिया व चीनसोबतचे संबंध जागतिक हित आणि आर्थिक विकास लक्षात घेऊन ठरवले आहेत, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले





