ट्रॅक्टर-जीपच्या भीषण अपघात वाहनाखाली चिरडून दोघाचा दुर्दैवी अंत…
![Tragic accident of a tractor-jeep crushed under the vehicle and the unfortunate end of the two ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/ट्रॅक्टर-जीपच्या-भीषण-अपघात-वाहनाखाली-चिरडून-दोघाचा-दुर्दैवी-अंत.jpg)
परभणी : ट्रॅक्टर-जीपच्या भीषण अपघात होऊन वाहनाखाली चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना झिरोफाटा पूर्णा रस्त्यावर एरंडेश्वर जवळ घडली आहे. अर्जून काळे, बाळासाहेब काळे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
अर्जुन काळे, बाळासाहेब काळे हे आपल्या लाल रंगाचे रोटावेटर करणारे ट्रॅक्टर घेऊन त्यामध्ये इंधन टाकण्यासाठी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर गावातून झिरोफाट्याकडे जात होते. यादरम्यान, झिरोफाट्याकडून पूर्णेकडे भरधाव वेगाने येणारी जीप एम. एच. २४ ए.जी. ९०७१ या वाहनाची ट्रॅक्टरसोबत समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भिषण होता की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. ट्रॅक्टरवर बसलेले अर्जून काळे, बाळासाहेब काळे हे वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा आवाज ऐकुन परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, पोलीस पाटील ज्ञानोबा काकटकर मदतीला धावून आले. घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गावंडे, पोलीस निरीक्षक. सुभाषचंद्र मारकड, पोलीस हेड काँस्टेबल सावंत, पोलीस काँस्टेबल शेख अहेमद, पोलीस काँस्टेबल मंगेश जुकटे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणीला पाठविण्यात आले असून पूर्णा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.