breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

PM किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळवण्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे आवश्यक

PM Kisan 17th Installment | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच PM किसान योजनेचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. अशातच आता PM किसान योजनेच्या १७ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी आणि एनपीसीआय करुन घेणं गरजेचं आहे. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

हेही वाचा     –      पुणे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी 

मात्र याकडे काही शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. अशा शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता मिळणार नाही. हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांनी या योजनेशी संबंधित सर्व अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

पीएम किसान १७ व्या हप्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पीएम-किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम योजना आहे, प्रधानमंत्री किसान योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • जमिनीच्या मालकीची कागदपत्रे
  • बँक खाते माहिती (खाते नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड)
  • मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button