breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी

पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलिधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपाकडूनच मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं..आता तुला नक्की पाडणार, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरची माहिती मिळताच महापालिकेकडून हे बॅनर हटवण्यात आलं आहे.

स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं…आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पडणार..कष्टाळू भाजप कार्यकर्ते, अशा आशयाचे बॅनर्स पुणे महापालिकेच्या परिसरात लावले आहेत. त्यामुळे भाजपचे बाकी इच्छूक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असल्याचं या बॅनरमधून स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा     –      चिंचवडगावात भाजपाच्या जाहिरातीला काळे फासले!

भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करणारे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या कामाच्या जोरावर युवा मोर्चापासून पक्षात काम केले आहे. भाजपची पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले तर लागलीच महापौर पदी काम करण्याची संधी देखील पक्षाकडून मोहोळ यांना मिळाली. आपल्या महापौरपदाच्या काळात कोरोनाच्या महामारीत त्यांनी केलेल्या कामामुळे संपूर्ण शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. तर आज मोहोळ हे प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button