अहमदाबादमधील १० शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये अमित शहा आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचाही उल्लेख

Ahmedabad : गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक सरकारी कार्यालयांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अशातच बुधवारी सकाळी अहमदाबादमधील १० शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यामुळे परिसरात घबराट पसरली. धमकीचे ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी शाळांची झडती घेतली. परंतु त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, या ईमेलमध्ये दुपारी १:११ वाजता बॉम्बस्फोट होतील असे म्हटले होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि साबरमती तुरुंगात बंद असलेले गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचाही उल्लेख होता. ईमेलची भाषा आणि संदर्भ पाहता तो खलिस्तानी दहशतवाद्यांनी पाठवल्याचा संशय आहे.
हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात असंतोष उफाळला ! राज्यातील महसूल अधिकारी काम बंद करणार
दरम्यान, खबरदारी म्हणून शाळांनी दुपारनंतर सुट्टी जाहीर करत सर्व मुलांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, श्वान पथक आणि घातपातविरोधी पथकांनी शाळांमध्ये शोध घेतला. तथापि, त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही.




