breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Threads ॲपचा १० मिलियन युझर्सचा टप्पा पुर्ण, ॲप डाउनलोड कसं करायचं?

Threads App : ट्वीटरला टक्कर देण्यासाठी मेटाने आपले नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच केलं आहे. थ्रेड्स असं या ॲपचं नाव आहे. हे ॲप लाँच झाल्यापासून अवघ्या काही विळातच याचे १० मिलियन युझर्स पुर्ण झाले आहेत. लाँचिंगनंतर ७ तासांत १ कोटींहून अधिक लोकांनी ही ॲप डाऊनलोड केलं आहे.

Threads ॲप डाउनलोड कसं करायचं?

थ्रेड ॲप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजे ॲपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. या सोबतच डेस्कटॉपवर देखील हे ॲप पावरता येणार आहे.

हेही वाचा – ‘अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध’; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

Threads ॲप मध्ये नेमकं काय खास आहे?

युरोपीय संघराज्यातील देशांमध्ये अद्याप थ्रेड्स अ‍ॅप लाँच केलेले नाहीत. मात्र याचे फिचर्स ट्विटरसारखेच आहेत. वापरकर्ते थ्रेडवर ५०० वर्णांपर्यंतचे संदेश पोस्ट करू शकतात. थ्रेड्स हा इंस्टाग्रामचाच विस्तारीत प्लॅटफॉर्म आहे. यावर, युजर्स टेक्स्ट संदेशांव्यतिरिक्त लिंक्स, फोटो आणि ५ मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकणार आहेत. पहिल्या चार तासांत या अ‍ॅपमध्ये ५ दशलक्ष युजर्स जोडले गेले. हे अ‍ॅप ‘युजर-फ्रेंडली’ ठेवल्याने याला जास्त यश मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button