breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

भारतीय हवाई दलासाठी फ्रान्सकडून खरेदी केलेले शेवटचे राफेल विमान दिल्लीत दाखल

नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

भारतीय हवाई दलासाठी फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ३६ राफेल विमानांपैकी शेवटचं राफेल विमान आज दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. या विमानानं फ्रान्समधून उड्डाण केल्यावर संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुन्हा इंधन भरून घेतल्यावर आज ते भारतात दाखल झालं आहे.

59,000 कोटींचा करार
पाच अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी 29 जुलै 2020 रोजी भारतात पोहोचली, भारताने फ्रान्सशी सुमारे 59,000 कोटी रुपये खर्चून 36 विमाने खरेदी करण्यासाठी आंतर-सरकारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सुमारे चार वर्षांनी ही विमाने भारतात दाखल झाली आहे.

‘राफेल करार हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गेम चेंजर होता आणि त्याचा समावेश जगाला आणि विशेषत: भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना एक मजबूत संदेश देतो, अशा भावना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यावेळी व्यक्त केल्या होता. आता शेवटच्या राफेल विमानाच्या लँडिंगसह, देशाला 36 राफेल लढाऊ विमानांची डिलिव्हरी पूर्ण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button