Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
PUBG चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने PUBG वरील बंदी उठवली
![The government lifted the ban on PUBG](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/PUBG--780x470.jpg)
BGMI India : PUBG मोबाईलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने कोरियन मोबाईल गेमिंग अॅप PUBG वरील बंदी उठवली आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने PUBG वर बंदी घातली होती.
आता krafton ची BGMI गेम परत आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, कंपनीला ३ महिन्यांचा चाचणी कालावधी देण्यात आला आहे. कंपनीने सर्व्हर आणि डेटा सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण केले आहे. खेळाडूंनी स्वत:चे नुकसान करू नये, कोणतेही व्यसन नसावे, यावर लक्ष ठेवले जाईल. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यानंतरच पूर्ण परवानगी दिली जाईल.
हेही वाचा – जिल्हाध्यक्षांकडून दोन चापट्या मारल्याचा दावा, सुषमा अंधारे म्हणाल्या..
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/PUBG-1024x576.jpg)
सरकारने काही अटींसह गेमिंग अॅपवरील बंदी उठवण्यास मंजुरी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव २ वर्षांपूर्वी त्यावर बंदी घालण्यात आली होती.