बेपत्ता पाणबुडीतील सर्वांचा मृत्यू?
![Six more submarines for the Indian Navy; 43 thousand crore project](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/panbudi.jpg)
नवी दिल्ली |
इंडोनेशियाची एक पाणबुडी बेपत्ता झाली असून त्यात एकूण ५३ कर्मचारी आहेत. या पाणबुडीतील काही वस्तू सापडल्या आहेत. पण ही पाणबुडी खोल समुद्रात बुडाली असावी व कुणी वाचले असण्याची शक्यता नाही. नौदलाचे प्रमुख युडो मारगोनो यांनी सांगितले की, पाणबुडीतील पाणतीराशी संबंधित वस्तू, पेरिस्कोपच्या उपकरणात वंगणासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रीसच्या बाटल्या, प्रार्थनेसाठीच्या सतरंज्या असे बरेच साहित्य सापडले आहे.
पाणबुडीमधील या वस्तू मिळाल्या असून ही पाणबुडी खोल गेली असावी असेच दिसून येत आहे. इंडोनेशियाने बुधवारी पाणबुडी बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. ती बाली बेटाजवळ बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. पण आता ती बुडाल्याची खातरजमा झाली असून त्यातील कुणी वाचले असण्याची शक्यता नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारीच पाणबुडीचा प्राणवायूचा पुरवठा संपलेला होता. इंडोनेशियाने पाणबुडीचा शोध बाली परिसरात शनिवारीही चालू ठेवला होता. अमेरिकेच्या पी ८ पोसाइडॉन या टेहळणी विमानाचे शनिवारी अवतरण झाले व त्याने शोध मोहीम सुरू केली.
वाचा- पुण्यातील आमदराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा मोठा डाव उधळला…