देशात काल दिवसभरात 9,765 कोरोनाबाधितांची नोंद
![The number of suspected Omicron patients has increased in Mumbai!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/coronavirus-2-1.jpg)
नवी दिल्ली – सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. देशात काल दिवसभरात 9 हजार 765 रुग्णांची नोंद झाली. तर 477 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 कोटी 46 लाख 06 हजार 541 वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 69 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 99 हजार 763 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगाची धाकधूक वाढवली आहे. संपूर्ण जग कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनशी झुंज देत आहे. जगभरातील 25 देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, अद्याप भारतात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र असे असले तरी जगभरातील ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. प्रत्येक राज्यांनीही सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे.