Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
Supreme Court of India has directed the Media: सर्वोच्च न्यायालयाचे प्रसारमाध्यमांना निर्देश; घबराट निर्माण होणाऱ्या बातम्या नको!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/14.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियासह माध्यमांना जबाबदारीची तीव्र भावना कायम ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.
देशातील नागरिकांना घाबरविण्यास कारणीभूत असत्यापित बातम्यांचा प्रसार होऊ नये याची काळजी घ्यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने सूचवले आहे.
देशात सध्या कोराना विषाणुबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दशहत निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. परिणामी, प्रसारमाध्यमांमधून इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. मात्र, असे असतानाही काही अफवा आणि निराधार बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी देशातील प्रसारमाध्यमांना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.