ताज्या घडामोडीराष्ट्रिय

दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन

शूटिंगवेळी मोठी दुर्घटना, 30 क्रू मेंबर्स असणारी बोट उलटली

राष्ट्रीय : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन लागल्याचे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना घडत आहेत. अभिनेता कलाभवन निजूचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाला होता, त्यानंतर आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक बोट उलटली ज्यामध्ये 30 क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली आहे.

बोट बुडाली

‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाचे शूटींग कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात सुरु आहे. मस्ती कट्टे भागात असलेल्या मणी जलाशयात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातातनंतर सर्वजण सुरक्षित आहेत. या घटनेत कोणतीली जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा –  सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त, वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला

महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाली

कांतारा चित्रपटाला मोठे यश मिळाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हे दुसरा भाग बनवत आहेत. मात्र मे महिन्यापासून शूटिंगदरम्यान अनेक अनुचित घटना घडत आहेत. आता बोट उलटून झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या घटनेत अनेक महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

शूटिंगपूर्वी देवाची पूजा

रामदास पुजारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘दक्षिण कन्नडमधील आत्म्यांवर चित्रपट बनवणे हे धोकादायक आहे. परंतु ऋषभ शेट्टीने या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी देवाची पूजा देखील केली होती आणि त्याने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी देखील घेतली होती.’

कांतारा चॅप्टर 1 कधी प्रदर्शित होणार?

कांतार चॅप्टर 1 चित्रपटाच्या शूटींग बाबत मे महिन्यापासून अनेक वाईट बातम्या समोर आल्या आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ३ कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच याशिवाय दोन मोठे अपघातही झाले आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख 2 ऑक्टोबर 2025 आहे, मात्र यात बदल होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button