Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-31-780x470.jpg)
Himachal Pradesh : राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेऊनच्या सुमारास चंबा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा – ‘श्रीरंग बारणे यांचे झोकून देऊन काम करा’; आमदार सुनील शेळके
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र चंबा असले तरी ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या मनालीतही भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवायला मिळाले. हा भूकंप ५.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद करण्यात आली आहे.