अमेरिकेत कोलोराडोच्या सुपर मार्केटमध्ये गोळीबार! पोलीस अधिकार्यासह 10 ठार
![Shooting at a Colorado supermarket in the US! 10 killed, including police officer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/KOLORONA-SUPER-MARKET.jpg)
वॉशिंग्टन- कोलोराडो प्रांतातील बोल्डर शहरातील एका सुपर मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकार्यांसह 10 जण ठार झाले आहेत. यात इतर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र या गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकेच्या कोलोराडो प्रांतातील बोल्डर शहरांमधील एका सुपर मार्केटमध्ये काही माथेफिरूनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यात 10 जण ठार झाले असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलिस अधिकार्याचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सुपर मार्केटमधील ग्राहकांची पळापळ झाली. त्यामुळे तेथे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. हा गोळीबार कोणी आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा ते तपास करत आहेत, अशी माहिती बोल्डरच्या पोलिसांनी ट्विटमध्ये दिली आहे.