ताज्या घडामोडीराष्ट्रिय

शंतनू नायडू टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर आणि हेड ऑफ स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह म्हणून नियुक्त

शंतनू आणि रतन टाटा यांचे भावनिक नाते

राष्ट्रीय : दिग्गज उद्योजक रतन टाटा यांना सर्व जग आदराने पहात होते. त्यांनी भारताचे नाव संपूर्ण जगात आपल्या ब्रँडद्वारे गाजविले. केवळ उद्योजक म्हणूनच नव्हे तर दानशूर म्हणून अनेक परोपकारी कामे त्यांच्या टाटा ट्रस्टमार्फत होत आहेत. अलिकडेच रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्या सोबत त्यांचा एक छोटा दोस्त अलिकडे सोशल मीडियावर दिसत होता. त्याचे नाव शंतनु नायडू ..याच शंतनु नायडू याच्या खांद्यावर टाटा मोटर्सने नवीन जबाबदारी सोपवली आहे. शंतनू नायडू आता टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर आणि हेड ऑफ स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह म्हणून नियुक्त केले आहे.

शंतनू नायडू यांनी लिंक्डइनवर एक इमोशनल नोट लिहीली आहे. शंतनू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय की,’ मला हे सांगताना आनंद होत आहे की टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, हेड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हच्या रुपात नवीन पद सांभाळत आहे. मला आठवतंय की माझे वडील टाटा मोटर्स प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅण्ट घालून घरी यायचे आणि मी त्यांची खिडकीत वाट पाहात असायचो.’

हेही वाचा  :  ‘नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा’; अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप 

गेल्यावर्षी रतन टाटा यांचे निधन झाले
गेल्यावर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा दोन दशकांहून अधिक काळ टाटा ग्रुपचे नेतृत्व करीत होते. शंतनू आणि रतन टाटा यांचे भावनिक नाते होते. शंतनू रतन टाटा यांचे पर्सनल असिस्टंट होते. टाटा देखील शंतनूला आपल्या नातू सारखे मानत होते. शंतनू टाटा यांचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. शंतनू टाटांना छोटी मोठी मदत करत होते. टाटांच्या अंतिम दिवसात शंतनू त्यांच्या सोबत होते.

शंतनू आणि टाटांचे नाते होते खास
शंतनू यांनी पुस्तक लिहीले होते. त्या पुस्तकाचे नाव I came upon a Lighthouse असे आहे. या पुस्तकात शंतनू याने सांगितलं की त्याने रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्या कुत्र्‍यांसारख्या पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या गळ्यात रिफलेक्टर घालणे सुरु केले होते. रतन टाटा या उपक्रमाने खूपच खूष झाले.त्यानंतर शंतनू याला टाटांनी आपला असिस्टंटच नेमले. साल २०१८ नंतर शंतनू रतन टाटा यांचे असिस्टंट बनले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button