breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियविदर्भ
पी व्ही नरसिंहराव, यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राम खांडेकर यांचे निधन
![PV Narasimha Rao, Yashwantrao Chavan's personal assistant Ram Khandekar passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Untitledbkknk.png)
नागपूर – देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. नागपूरमधील त्यांच्या मूळगावी काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 87 वर्षांचे होते.
राम खांडेकर हे अत्यंत सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तिमत्त्व होते. नरसिंहराव यांच्यासोबत 1985 ते त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी काम केले, तर यशवंतराव चव्हाण यांचेही खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभव त्यांनी पुस्तकाच्या स्वरुपात मांडले असून 2019 साली ‘सत्तेच्या पडछायेत’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. दरम्यान, राजकारणाबरोबरच खांडेकर यांनी वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे.