पुतीन चुकीचं पाऊल उचलून युद्धाला आमंत्रण देतायत – जो बायडेन
![Putin is taking the wrong step and inviting war - Joe Biden](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/putin.jpg)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दोनेत्स्क भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केलीय. त्यांनी टीव्हीवर एका भाषणात ही घोषणा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच, त्यांनी मात्र अशा प्रकारे लष्करी कारवाई सुरू करत असल्याचं जाहीर केलंय. पुतीन यांच्या घोषणेनंतर आता दोनेत्स्कच्या भागामध्ये रशिया आणि युक्रेनच्या लष्करामध्ये थेट संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
युक्रेन आणि रशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियानं उचललेल्या आक्रमक पावलामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला इशारा दिलाय. रशियावर निर्बंध लादणार असल्याचं जो बायडन यांनी म्हटलंय. रशियाच्या संसदेनं लष्कराला देशाबाहेर सशस्त्र कारवाई करण्यास परवानगी दिलीय. म्हणजेच, युक्रेनमधील दोनेत्स्कसारख्या भागात रशिया आता सैन्य पाठवण्याची शक्यात आहे.