ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपाचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल!

आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी मोठा धक्का

सांगली : भाजपाचा आमदार सत्यजित देशमुख यांच्या होमपिचवर शिराळा तालुक्यात भाजपाची पिछेहाट झालेली आहे. शिराळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची हाराकिरी झाली आहे. कोकरुड या अवघ्या एका गटात पक्षाला विजयाचा गुलाल उधळता आला आहे. उर्वरित तीनही जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.

कोकरुडमध्ये साईतेजस्वी यांच्या समवेत पंचायत समितीसाठी कोकरुड गणातून भाजपचे बाजीराव पाटील आणि कणदूर गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे सम्राटसिंग नाईक निवडून आले आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांचा एकत्रित झेंडा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. भाजपचे वर्चस्व असणारी पंचायत समिती हातातून गमवावी लागली आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्यासाठी हा विजय महत्वाचा ठरला आहे. मानसिंगराव यांनी विधानसभेतील पराभवाचा उट्टे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काढल्याचे मानले जाते. मांगले गटातून राष्ट्रवादीचे विराज नाईक विजयी झाले आहेत. वाकुर्डे बुद्रुक गटातून राजेश्वरी रणधीर नाईक, वाकुर्डे गणातून रवींद्र आढाव आणि पाचुंब्रे गणातून सविता महाडिक हे अजित पवार गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button