पबजी न्यू स्टेट! ११ नोव्हेंबरला नवीन रुपात पबजी गेम येणार
![Pubji New State! Pubji game will come on November 11 in a new form](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/pubg-1.jpg)
नवी दिल्ली – मोबाईल गेम प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. पबजी न्यू स्टेट ११ नोव्हेंबरला नवीन रूपात येणार आहे. हा गेम भारतासह २०० पेक्षा अधिक देशांमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल, असे दक्षिण कोरियाच्या क्राफ्ट या कंपनीने म्हटले आहे. या खेळाची अंतिम चाचणी २९ आणि ३० ऑक्टोबरला २८ देशांमध्ये केली जाणार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
पबजी हा तरुणाईचा सर्वात जास्त आवडता मोबाईल गेम आहे. पबजी न्यू स्टेट गेम ११ नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. त्यासाठी ५ कोटींपेक्षा अधिक जणांनी आगाऊ नोंदणी केली आहे. अँड्रॉइड आणि आयओएस यावर त्याची पूर्व नोंदणी झाली आहे. जागतिक स्तरावर या गेमची घोषणा झाल्यानंतर त्याची पूर्व नोंदणी सुरू झाली. भारतात सप्टेंबरमध्येच या गेमची पूर्व नोंदणी झाली. पबजी न्यू स्टेट जगभरातील १७ भाषांमध्ये फ्री-टू-प्ले मोबाईल गेम म्हणून लॉन्च होणार आहे. २०५१ च्या थीमवर आधारित पबजी न्यू स्टेट पुढच्या पिढीतीला बॅटल रॉयल अनुभव देईल. यात नवीन रेंडरिंग टेक्नॉलॉजी आणि १ गनप्ले सिस्टम समाविष्ट असेल, असे कंपनीने म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये या गेमसाठी ४ कोटी लोकांनी नोंदणी केली. त्यानंतर एका महिन्यात एक कोटी जणांनी नोंदणी केली. यावरून गेमची लोकप्रियता लक्षात येते, असे कंपनीने म्हटले आहे.