आसामच्या पारंपरिक नृत्यावर प्रियांका गांधी थिरकल्या
![Priyanka Gandhi shuddered at the traditional dance of Assam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/SAVE_20210301_163839.jpg)
नवी दिल्ली – एकिकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा या आसामच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही राज्यात एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.
आसामच्या दौऱ्यात ४९ वर्षीय प्रियांका गांधी यांनी चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लखीमपूर भागाला भेट दिली. इथे आदिवासी तरुणींसोबत पारंपरिक ‘झूमर’ नृत्यातही त्या सहभागी झाल्या.
काँग्रेस पक्षाकडून प्रियांका गांधींच्या या नृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी मीडिया आणि सुरक्षारक्षकांच्या गराडात घेरल्या गेलेल्या प्रियांका गांधी पारंपरिक स्थानिक नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत थिरकण्याचा आनंद अनेक स्थानिक तरुणींनीही घेतला.
यावेळी, आदिवासी महिलांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. तर प्रियांका गांधी यांनी जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. तसंच आसामचा पारंपरिक उपरणंही त्यांनी गळ्यात टाकलेलं आहे.