ताज्या घडामोडीदेश-विदेश

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर मोठी कारवाई

दुबई विमानतळावर अटक, माजी मॅनेजरशी असलेला वाद भोवला

दुबई : भारतात मोठा चाहतावर्ग असणारा लोकप्रिय पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. खान त्यांच्या काही परफॉर्मन्ससाठी युएईमध्ये होते, त्याठिकाणीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

राहत फतेह अली खान यांना युएईमध्ये बुर्ज दुबई पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले होते. अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी ते याठिकाणी आलेले. या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान खान आणि त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांच्यामध्ये दीर्घ काळापासून तणाव होता. सलमान यांनी दुबई आणि इतर शहरांत त्यांच्याविरोधात कायदेशीर खटले दाखल केले आहेत. याबाबत कारवाई करत त्यांना दुबई एअरपोर्टवर अटक करण्यात आल्याचे समोर आले.

वर्षाच्या सुरुवातीलाही सापडले होते अडचणीत

या वर्षाच्या सुरुवातीलादेखील खान अडचणीत सापडले होते. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) राहत फतेह अली खान यांच्यावर कारवाई केली होती. राहत यांच्यावर १२ वर्षांत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संगीत मैफिलीतून अंदाजे ८ अब्ज रुपये कमावल्याचा आरोप आहे. एजन्सीने गायकाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती.

व्हायरल व्हिडिओमुळेही उडालेली खळबळ

याशिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला, ज्यात ते त्यांच्या एका शिष्याला मारहाण करत असल्याचे दिसत होते. व्हिडिओमध्ये ते संबंधित व्यक्तीला एका बाटलीबद्दल विचारत होता आणि चप्पलने मारत होता. मात्र कालांतराने त्या शिष्याने खान यांच्या वागण्याचे समर्थन केलेले आणि या प्रकरणावर पडदा पडलेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button