Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

‘पाकिस्तान नरेंद्र मोदी यांना घाबरतो, म्हणून…’; अमित शाह यांचे विधान

Amit Shah :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना दहशतवादांना इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाकिस्तान घाबरताे. त्यामुळेच जम्मू-काश्मीर सीमेवर शांतता आहे. भारत ताेडीस ताेड प्रत्युत्तर देईल, हे माहित असल्यामुळेच पाकिस्तान गाेळीबार करण्यास धजावणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी ते म्हणाले की, “केंद्र सरकारने तरुणांच्या हातात बंदुका-दगडांऐवजी लॅपटाॅप देत दहशतवादाचा बिमाेड केला. सरकार जम्मूच्या पर्वतरांगांमध्ये बंदुकांचा आवाज येऊ देणार नाही.शाह यांनी नॅशनल काॅन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस या तीन पक्षांवर काश्मीरमध्ये दहशतवाद वाढण्यासाठी दाेषी ठरविले. ”

हेही वाचा –  ‘मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती, भाजपात घ्या असं म्हटलं नव्हतं’; एकनाथ खडसेंचा दावा!

शाह म्हणाले की, “१९४७ मध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या गुज्जर आणि बक्करवाल समुदायावर देशाला अभिमान आहे. दहशतवाद फाेफावला त्यावेळी यांनीच शत्रूच्या गाेळ्या छातीवर झेलल्या. पहाडी, गुज्जर आणि बक्करवाल समुदायांना केवळ नाेकरीतच नाही तर पदाेन्नतीमध्येही आरक्षण देण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे, असे शाह यावेळी म्हणाले. दहशतवाद थांबविणार नाही, ताेपर्यंत पाकिस्तानसाेबत काेणतीही चर्चा हाेणार नाही, असेही ते म्हणाले.

“इथले पूर्वीचे राज्यकर्ते पाकिस्तानला घाबरत होते, पण आता पाकिस्तान मोदींना घाबरत आहे. म्हणूनच ते गोळीबार करण्याचे धाडस करणार नाहीत, परंतु त्यांनी तसे केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दहशतवाद थांबविणार नाही, ताेपर्यंत पाकिस्तानसाेबत काेणतीही चर्चा हाेणार नाही,” असेही ते म्हणाले.

भाजप नेते जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आणि पुंछमधील सुरनकोट, राजौरी जिल्ह्यातील थानामंडी आणि राजौरी आणि जम्मू जिल्ह्यातील अखनूर येथे आणखी चार निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर आणि तत्कालीन राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला होणार आहे. यानंतर 1 ऑक्टोबरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button