गुजरातला एक हजार कोंटीचे पॅकेज! गुजरात पॅकेजवरून राजकारण तापले
![Union Council of Ministers meetings for three consecutive days from 10th](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Narendra-Modi-2-1.jpg)
- सत्ताधिकारी- विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
अलिबाग |
गुजरातला एक हजार कोंटीचे पॅकेज देण्यावरून राज्यात राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. पंतप्रधान मोदी गुजरातला गेले त्यांनी गुजरात राज्यासाठी एक हजार कोटींची घोषणा मग बाकीच्या राज्यांचे काय असा सवाल महाविकास आघाडीकडून केला जाऊ लागला आहे. तर गुजरातला सर्वाधिक फटका बसल्याने पंतप्रधानांनी पहाणी करून मदतीची घोषणा केली आहे. मदत सर्वच राज्यांना मिळणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाची पहाणी केली. कोकणाला वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर वादळग्रस्त जिल्ह्यासाठी मदत पॅकेजची घोषणा दिली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याची पहाणी करून एक हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. महाराष्ट्रालाही या वादळाचा तडाखा बसला, मग महाराष्ट्राच्या मदतीचे काय, याचे उत्तर राज्यातील विरोधी पक्षांनी द्ययाला हवे असा मुद्दा वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.
याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. वादळाच्या सर्वाधिक फटका गुजरातला बसला. पंतप्रधानांनी तेथील परिस्थितीची पहाणी केली. पहाणी नंतर मदतीची घोषणा केली. इतर राज्यांनाही यात मदत केली जाणार असल्याचे पंत्रप्रधान कार्यालयाकडून जारी कऱण्यात आलेला प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना वादळाचा फटका बसला आहे. यातील कर्नाटक आणि गोव्यात भाजपची सत्ता आहे. मात्र त्या राज्यांसाठी मदत जाहीर झालेली नाही. यात जाणिव पुर्वक राजकारण केले जात आहे. सर्वच राज्यांना केंद्र सराकर मदत करेल. एनडीआरएफ जो निधी दिला जातो तो देखील केंद्र सरकारचाच असतो असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. दरम्यान निसर्ग वादळातील मदत मच्छीमारांपर्यंत पोहोचली नसल्याचा तसेच बागायतदारांना तोकडी मदत दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपांचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खंडन केले. विरोधीपक्षांना आरोप करण्यापलीकडे कामच नाही. निसर्ग वादळानंतर राज्याने कोकणासाठी साडेसातशे कोटींचे पॅकेज दिले. एखादा व्यक्ती राहीले असतील. एनडीआरएफचे निकष बदलून वादळग्रस्तांना मदत दिली गेली. फळबागांसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत केली. राज्याने स्वताच्या तिजोरीतून हे पैसे दिले. अजूनही कोणी मदतीपासून वंचित राहीले असेल तर आम्ही देत आहोत. त्यामुळे विरोधकांनी वस्तुस्थिती घ्यावी असा टोला त्यांनी लगावला. एकुणच गुजरात पॅकेजच्या घोषणेवरून राज्यात राजकारण तापण्यास सुरवात झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरवात झाल्याचेही यावरून पहायला मिळत आहे.
वाचा- “खरंच बेस्ट सीएम! चक्रीवादळालाही लाजवेल असा दौरा केलात”- मनसे