आता व्हॉट्सऍपवर वायफळ चर्चेला मनाई; महिन्यात २० लाख अकाउंट बंद
![Now ban waffle discussion on WhatsApp; 2 million accounts closed in a month](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/whatsapp.jpg)
नवी दिली – यापुढे व्हॉट्सऍपच्या माध्यमातून वायफळ आणि फालतू चर्चा करणाऱ्या आणि आपेक्षार्ह मेसेज पाठविणार्यांना दणका बसणार आहे. देशात मागील एका महिन्यात व्हॉट्सऍपच्या २० लाख अकाउंटवर अशी कारवाई करत ते बंद करण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आता माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. केंद्र सरकराच्या या नव्या नियमावलीस सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म देणार्या कंपन्यांनी विरोध केला होता. मात्र याच कायद्यामुळे आता भारतात एका महिन्यात व्हॉट्सऍपचे २० लाख अंकाउंट बंद केले गेले आहेत. १५ मे ते १५ जून या एक महिन्याच्या काळात आक्षेपार्ह मजकूर असणारे हे अकाउंट आहेत.
व्हॉट्सऍपने देशात अशा प्रकारे प्रथमच कारवाई केली आहे. यासंदर्भात व्हॉट्सऍपने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महिन्यात आक्षेपार्ह मेसेज करणारे ८० लाख अकाउंट बंद केले आहेत. यातील २० लाख अंकाउंट हे भारतातील आहेत. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ज्या अकाउंटवरून आक्षेपार्ह मजूकर देण्यात आला. तसेच सामाजिक सलोखा व शांतता बिघडविणार्या मजकूर व्हायरल करणार्या अकाउंटवरच ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनावश्यक मेसेज येणार्या लोकांनी संबंधित अकाउंटसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. अशा व्हॉट्सऍप अकाउंटवरही बंदी घातली आहे. व्यक्तिगत बदनामी करणारे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविणार्यांवरही बंदी घालण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.