रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, RBI चं धोरण जाहीर
RBI Monetary Policy Meeting 2024 | केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील निर्णय जाहीर केलेत. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर ठेवला आहे. केंद्रीय बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली आहे. रेपो दराच्या निर्णयामुळे व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. तसंच, गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे हप्ते वाढणार नसल्याने दिलासाही मिळाला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांद दास म्हणाले की, महागाई मोठ्या प्रमाणावर घसरत चालली आहे. आरबीआयने कोविडच्या काळात म्हणजेच मे २०२० मध्ये रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सने कपात करून ४ टक्क्यांवर आणली होती. त्यावेळी कोविड महामारीने संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम केला होता. परिणामी मागणी मंदावली, उत्पादनात कपात झाली आणि नोकऱ्या कमी झाल्या. तेव्हापासून, महामारी कमी झाल्यानंतर उच्च चलनवाढीचा सामना करण्यासाठी आरबीआयने रेपो दर २५० अंकांनी ६.५० टक्क्यांनी वाढवला आहे.
हेही वाचा – भारतीय कुस्टीपटू अंतिम पंघालची ऑलिम्पिकमधून हकालपट्टी, पॅरीस सोडण्याचे आदेश
रेपो रेट म्हणजे काय?
आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. हा रेपो रेट म्हणजेच बँकांना दिला जाणारा कर्जाचा दर होय. जेव्हा हा दर म्हणजेच बँकांना व्याज देण्याचा दर कमी होतो तेव्हा कर्ज स्वस्त होते. याचा थेट परिणाम हा होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनवर होत असतो. या कर्जाच्या किंमतीमुळे ईएमआयच्या किमतीही वाढतात.