Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

पॅन कार्डसाठी नवे कडक नियम लागू; ‘ही’ कागदपत्रे असतील तरच मिळणार नवीन पॅन कार्ड

Pan Card | आज, १ एप्रिल २०२६ पासून देशभरात पॅन कार्ड काढण्यासाठी आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नवीन आणि अधिक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. याआधी केवळ आधार कार्डच्या मदतीने पॅन कार्ड सहज काढता येत होते, मात्र आता ही सुविधा शासनाकडून बंद करण्यात आली आहे. सिक्युरिटीज मार्केट, म्युच्युअल फंड आणि इतर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य असल्याने या नवीन नियमांची माहिती नागरिकांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

नवीन नियमांनुसार आता पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डसोबत इतर काही सरकारी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, १० वीची गुणपत्रिका, पासपोर्ट किंवा दंडाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र यापैकी किमान एक कागदपत्र आवश्यक असणार आहे. ही कागदपत्रे नसल्यास नवीन पॅन कार्डचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा       :              पिंपळे निलखमध्ये अनधिकृत RMC प्लॅन्टचा कहर!

यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील नाव व इतर माहिती अगदी तंतोतंत जुळणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. जर दोन्ही कागदपत्रांमधील माहितीमध्ये कोणताही फरक आढळला, तर अर्ज थेट नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन अर्ज करण्यापूर्वी आधार कार्डवरील माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पॅन कार्डसाठी आजपासून पूर्णपणे नवीन अर्ज फॉर्म जारी करण्यात आले असून जुन्या फॉर्मवर कोणतेही नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आयकर विभाग आणि अधिकृत सरकारी पोर्टलवरूनच अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेअर बाजार किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या पॅन कार्डची माहिती नवीन नियमांनुसार अपडेट ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button