Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘नवीन यांची नियुक्ती म्हणजे मोदींच्या दूरदृष्टीचा पूरावा’; अनुराग ठाकूर यांनी केले कौतुक

हमीरपूर : भाजपने बिहारचे आमदार नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. हमीरपूरचे भाजप खासदार, अनुराग ठाकूर यांनी या गोष्टीचे कौतूक करताना, ही नियुक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे तरुणांना राजकारणामध्ये येण्याचे प्रोत्साहन असून, त्यांचा हा निर्णय तरुणांसाठीच्या दूरदृष्टीचा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात बोलताना ठाकूर म्हणाले की, नितीन नवीन यांनी संघटनात्मक व शासकिय अशा दोन्ही स्तरांवर कठोर परिश्रम, शिस्त व वचनबद्धतेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिहारच्या राजकारणात त्यांचे सक्रिय योगदान, संघटनात्मक कार्यक्षमता आणि विकास केंद्रीत दृष्टीकोन असल्यानेच त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या सर्वात तरुण राष्ट्रीय कर्याध्यक्षांपैकी एक असणे ही त्यांच्या क्षमता व पक्षाविषयी असलेल्या समर्पणाला मिळालेली दाद असल्याचे देखील ठाकूर म्हणाले.

हेही वाचा –  “प्री इलेक्शन धमाका” ; प्रशासकांकडून २५० कोटींच्या निविदा मंजुर

त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप संघटनात्मकदृष्टीकोनातून अधिक मजबूत होवून राष्ट्रसेवेच्या संकल्पाला नवी गती मिळू शकेल, अशी आशा ठाकूर यांनी व्यक्त केली. ४५ वर्षीय नवीन हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र असून, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. पाच वेळा आमदार राहिलेले नवीन बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी बिहार सरकारमध्ये दोनदा मंत्री म्हणून काम केले आहे.

तरुण नेतृत्वावर पक्षाचा विश्वास

बिहार मंत्रीमंडळातील मंत्री नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर् पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची देखील शक्यता आहे. नवीन यांची निवड हे तरुण नेतृत्वावरील पक्षाचा विश्वास आणि त्याच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब असल्याचे मत हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button