breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

NASA ने अंतराळ यानाच्या लँडिंगचे अद्भभूत फोटो केले शेअर

नवी दिल्ली – अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचं अंतराळ यान ओसिरिस रेक्स (Osiris rex) ने लघुग्रह बेन्नूपर्यंत पोहोचल्यानंतर फोटो पाठवण्यास सुरूवात केली आहे. नासाने लघुग्रहांची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, ज्यात अंतराळ यान पृष्ठभागावर उतरताना दिसत आहे.

अंतराळ यानानं लघुग्रह बेन्नुवर नमुने गोळा करण्यास सुरुवात केली असून काही नमुने गोळा करण्यात यश आले आहे. अपोलो मिशननंतर अवकाशातून संकलित केलेले सर्वात मोठे नमुने घेत सप्टेंबर 2023 मध्ये ओसिरिस रेक्स यान पृथ्वीवर परत येईल अशी अपेक्षा आहे, शक्यतो सौर मंडळाचा उगम जाणून घेण्यास मदत होईल.

मिशनचे प्रमुख डैंटे लौरेटा म्हणाले की, “छायाचित्रांचे विश्लेषण केल्याने हे सिद्ध झाले की नमुना संकलनाचे काम चांगले चालले आहे. आम्ही ते शक्य तितके चांगले होईल अशी कल्पना करू शकतो. लघुग्रहाच्या पृष्ठभागावर कण उडत आहेत आणि आम्हाला खरोखरच त्याची अपेक्षा होती.”

लघुग्रहातून नमुने गोळा करणारा अमेरिका दुसरा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ जपानने हे केले होते. ओसिरिस रेक्स गेल्या 2 वर्षांपासून लघुग्रह बेंन्नूबरोबर प्रवास करीत होता आणि आता त्याला यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button