Miss India 2023 : राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने अवघ्या १९ व्या वर्षी पटकावला ‘मिस इंडिया’ किताब
![Nandini Gupta from Rajasthan won the Miss India title at the age of 19](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Miss-India-2023-780x470.jpg)
Miss India 2023 : ५९वा ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेचा ग्रँड फिनाले काल मणिपूर येथे संपन्न झाला. यामध्ये राजस्थानातील कोटा येथून आलेली १९ वर्षीय नंदिनी गुप्ता हिने ‘मिस इंडिया २०२३’चा किताब पटकावला आहे. तर दुसरा क्रमांक दिल्लीच्या श्रेया पुंजा हिने पटकावला आहे. तसेच मणिपूरची थोनावजाम स्ट्रेला लुआंग हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या फिनालेमध्ये अनन्या पांडे, कार्तिक आर्यन अशा बॉलिवूड स्टार्सचा देखील सहभाग होता. अखेर या स्पर्धेत नंदिनी गुप्ताने बाजी मारली आहे. २०२३ चा मिस इंडिया किताब पटकावणारी नंदिनी ही विद्यार्थी आणि मॉडेलही आहे. बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये तिने पदवी मिळवली आहे.
या स्पर्धेचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सर लैश्राम सरीता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिझायनर्स रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केलं आहे.