Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
पाकिस्तानच्या माजी राजदूताच्या मुलीची हत्या
![Murder of daughter of former ambassador of Pakistan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/murder-couple.jpg)
इस्लामाबाद |
अफगाणिस्तानच्या पाकिस्तानातील राजदूतांच्या मुलीच्या अपहरणावरून पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात मोठे राजनैतिक भांडण उद््भवल्यानंतर काही दिवसांतच, पाकिस्तानच्या एका माजी राजदूताच्या मुलीची येथे हत्या करण्यात आल्याचे वृत्त माध्यमाने बुधवारी दिले.
शौकत मुकादम यांची मुलगी नूर मुकादम (२७) मंगळवारी राजधानी इस्लामाबदच्या एका आलिशान भागात मृतावस्थेत आढळल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले. मुकादम यांनी पूर्वी दक्षिण कोरिया व कझाकस्तानमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. नूरला गोळ्या घालून मारण्यात आल्याचे पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे. या संबंधी नूरच्या मित्राला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.