छत्रपती संभाजीराजे यांना बोलू द्यावे म्हणून खासदार संजय राऊत बसले अडून!
मुंबई | प्रतिनिधी
राज्यसभते आज छत्रपती संभाजीराजे यांना बोलण्याची संधी दिली जावी, यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत हे सभातींसमोर अडून बसल्याचे दिसून आले. त्यावर सभापतींनी अखेर आपण त्यांना बोलण्याची संधी देत आहोत, असे सांगून संभाजीराजेंना बोलू दिलं. या प्रकाराबाबतची माहिती संभाजीराजे यांनी स्वतः ट्विट्द्वारे देखील दिली आहे.
”१२७ व्या घटनादुरूस्तीवर आपले मत मांडत असताना संजय राऊत यांनी देशाचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेत, माझ्या मराठा आरक्षण लढ्यातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. तसेच या विधेयकावर माझे मत ऐकून घ्यावे, यासाठी सभापतींकडे जोरदार आग्रह धरला. या आग्रहास इतर खासदारांनीही उस्फूर्तपणे पाठिंबा देत माझे मत ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. सुदृढ लोकशाहीचे हे दर्शन आहे. यामुळेच मी संसदेत आरक्षणाची बाजू ठामपणे व अत्यंत आत्मविश्वासाने मांडू शकलो. याबद्दल माझ्या सर्व सहकारी खासदारांचे मनःपूर्वक आभार !” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
१२७ व्या घटनादुरूस्तीवर आपले मत मांडत असताना @rautsanjay61 यांनी देशाचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेत, माझ्या मराठा आरक्षण लढ्यातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. तसेच या विधेयकावर माझे मत ऐकून घ्यावे, यासाठी सभापतींकडे जोरदार आग्रह धरला. pic.twitter.com/eNfyykAhMZ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 11, 2021