breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Monsoon 2022: चार दिवस आधीच ‘या’ राज्यात मान्सूनचं आगमन, ५ दिवसात अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली : देशात मान्सूनचं आगमन झालं अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. अशात नैऋत्य मान्सून पश्चिम बंगालमध्ये नियोजित वेळेच्या ४ दिवस आधी पोहोचला आहे. अशा स्थितीत पश्चिम बंगालच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार, ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनामुळे आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर आणि पश्चिम बंगालच्या भागात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारताच्या दिशेने जोरदार नैऋत्य वारे आल्यामुळे, पुढील ५ दिवसांत ईशान्य राज्यं आणि उप-हिमालय पश्चिमेकडे आणि बंगालमध्ये जोरदार पाऊस पडेल.

ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, बंगालच्या उपसागराच्या ईशान्य आणि पूर्व मध्य भागाच्या काही भागात पुढे सरकला आहे आणि मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. मान्सून सुरू झाल्यामुळे ८ जूनच्या सकाळपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्येही मुसळधार पाऊस

पुढील पाच दिवसांत पश्चिम बंगालमधील गंगेच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारताच्या दक्षिण द्वीपकल्पाकडे अरबी समुद्रातून येणारे मान्सूनचे वारे पाहता, कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीपच्या किनारी आणि दक्षिणेकडील भागात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील पाच दिवस आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या काही भागात पाऊस पडू शकतो.

यंदा मान्सून सामान्य

अशात, वायव्य भारतात कमाल तापमानात वाढ होत असून हवामान खात्याने पुढील दोन दिवस राजस्थान, दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने सोमवारी सांगितले की, यंदा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. IMD नुसार, ईशान्य भारत आणि नैऋत्य द्वीपकल्पातील सर्वात कमी क्षेत्र वगळता यावेळी देशभरात मान्सूनच्या पावसाचे वितरण समान असेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button