निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा ममतांचा इशारा
पश्चिम बंगाल |
निवडणूक आयोगाचे (ईसी) तीन विशेष निरीक्षक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकत्र्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी येथे केला. निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या कारस्थानाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ममतांनी स्पष्ट केले.
बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरमधील सभेत त्या म्हणाल्या की, आयोगाचे हे निरीक्षक तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या आधीच्या रात्री ताब्यात घेण्याचे आदेश देत असून त्यांना सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोठडीत ठेवले जात आहे, व्हॉट््सअॅपवरील याबाबतचे संभाषण भाजपमधील काही लोकांनीच आपल्याला दिले आहे. ममतांनी विशेष निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांशी केलेल्या संभाषणाची प्रत सादर केली. दरम्यान, भाजपचे नेते दिलीप घोष आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आयोजित केलेल्या सभेत करोनानियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा शनिवारी तृणमूलने केला.
वाचा- पुण्यातील आमदराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा मोठा डाव उधळला…