लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण
![Lok Sabha Speaker Om Birla infected with corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/om-birla.jpg)
नवी दिल्ली – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, बिर्ला यांनी १९ मार्च रोजी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि दुसर्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “ते स्थिर आहेत आणि त्याचे सगळे रिपोर्ट सामान्य आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
बिर्ला यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे संसदेच्या सध्याच्या अधिवेशनावर याचा कसा परिणाम होईल हे केवळ वेळच सांगेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेल यांच्यासह ३० खासदारांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या वर्षी संसदेचे पावसाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते.
Lok Sabha Speaker Om Birla tested positive for COVID19 on March 19. He was admitted to AIIMS COVID Centre for observation on March 20. He is stable: AIIMS, Delhi pic.twitter.com/nhook5tr83
— ANI (@ANI) March 21, 2021