ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र संघाचे आदिती स्वामी, प्रतिक वाईकर ध्वजवाहक, अजित पवारांच्या हस्ते ध्वज हस्तांतरण समारंभ

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांची माहिती

पुणे : डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्र संघाची सलग दुसर्‍या विजेतेपदासाठी जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेसाठी जागतिक पदक विजेती आर्चरी खेळाडू आदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांना महाराष्ट्र संघाचे ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच वर्चस्व गाजविणारे महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ रविवारी उत्तराखंडला रवाना होणार आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांनी ही माहिती दिली आहे.

38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संजय शेटे यांची महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख निवड करण्यात आली असून, उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे व स्मिता शिरोळे यांची उपपथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात जागतिक पदक विजेती आर्चरी खेळाडू आदिती स्वामी व जागतिक विजेता खो-खो क्रीडापटू प्रतिक वाईकर हे ध्वजवाहक असणार आहेत.महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज सन्मानपूर्वक रविवारी 26 जानेवरीला रविवारी सकाळी 8 वाजता शिवाजीनगर येथील पोलिस मैदानात हा ध्वज हस्तांतरण समारंभ होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री उत्तराखंडच्या स्वारीवर जाणार्‍या खेळाडूंंना शुभेच्छा देतील.

हेही वाचा –  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राचा खो-खो संघ सर्वप्रथम रवाना
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच वर्चस्व गाजविणारे महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ (पुरूष व महिला) रविवारी पहाटे उत्तराखंडला रवाना होणार आहेत. ठाण्याच्या गजानन शेंगाळ याच्याकडे पुरूष खो-खो संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले असून, महिला संघाच्या नेतृत्वाची धुवा धाराशीवच्या संपदा मोरे हिच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ गतवर्षीचे सुवर्णपदक विजेते आहेत. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव यांच्या उपस्थितीत खेळाडूंना निरोप देण्यात आला.

38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 28 जानेवारी 14 फेब्रुवारी या कालावधित रंगणार असून, 32 विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ 900 पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button